वारी चालली...

(दिंडी चालली हो...चे विडंबन)

स्वा
री चालली आमची
वारी चालली हो
श्रेष्ठींच्या दर्शनाला  आमची वारी चालली

मुखी कार्याचा गजर
हाती फुलानोटांचे हार
संगे नाती गोती  सारी फौज चालली

घातले पहिले रिंगण जिल्हा परिषद
घेऊनी भुखंड झालो शिक्षण सम्राट
स्पर्शी जो पायताण त्यांची सोय लावली

धरिले दुसरे रिंगण महापालिका            
दिमतीला अधिकारी नगरसेवका
टोलनाका टेंडर सारी  सोय लावली

धन्य धन्य मी सारे मला मिळाले                
संगे भाई दादा सम्राट  ही आले                 
माऊलीच्या कृपेने पिढ्यांची सोय झाली

एक आता उरे अजूनी रिंगण
म्हणूनी आलो पुन्हा एकदा नमन
मिळू दे मला आता मंत्रिपद माउली

विडंबनकार: अरविंद रामचंद्र बुधकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: