चारोळ्या...

"  चार  चारोळ्या -  "

खांदा देण्या कितिदा गेलो
इतक्या वेळा मी गेलो -
आपल्यासाठी उरले कोणी
पहावयाचे विसरून गेलो !   |१|
        
एक तारखेची गंमत असते
आमच्या प्रेमा भरती येते -
माझ्या नयनीं पत्नी असते 
तिचिया नयनीं वेतन असते !  |२|

कचरामुक्त जगास बघावे
ध्यास मनीं  जरि  धरतो -
अशक्य मजला परि वाटते,
जोवर मी लेखन करतो !  |३|

                          
सावलीतही गॉगल लावून
हीरो बनण्या गेलो ,
' डोळे नाहीत आले- '
सांगत घामाघूम झालो !  |४|
कवी: विजयकुमार देशपांडे