कोणा कशी कळावी....(२)

कोणा कशी कळावी ''दारूत'' काय गोडी
धुंदीत सारी सुटती  चिंता गूढ कोडी

कधी ग्लासात घेऊन प्यावे
कधी बाटलीसह मुखी घ्यावे
''चिअर्स'' म्हणता सुखीदुःखी एक खोपडी

होई खूश जनता
पाहून फुकट चाळे
जळे मन तरी करी बेफाम खूश चावडी

टपलीत मारे कुणी मारू दे
ओढीती कपडे कुणी ओढू दे
धुंदीत मी ना कळे मला काय करतो लफडी

विडंबनकार: अरविंद रामचंद्र बुधकर