ते देशभक्त ठरले....

लाचारी माजोरी  अन हुजरे
दांभिकची भरले
राजनिष्ठ ते सारे देशभक्त ठरले

जो जो करी तोडपाणी
त्याच्या मागे सत्तालोणी
शिक्षा भोगूनी जे सुटले ते महर्षी ठरले

हैराण झाली सारी जनता
जो तो पाहे कधी होई नेता
ना विवेक ना आचार हात मारू लागले

चरण स्पर्श जडता त्यांचे
उभ्या घराचे स्मशान होते
राखेमध्ये वसुलीचे गळफास लागले

विडंबनकार :  श्री अरविंद रामचंद्र बुधकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: