असतं हो एखाद्याचं नशीब.. , एखाद्या वेळी तरी जोरावर..!
:
बर्याच वर्षानंतर, बायकोने एक दिवस सकाळीच माहेरी जायचे ठरवले.
म्हटलं- 'बायको माहेरी जाते हो, जाऊ द्या..!'
वरकरणी मी तिला भरल्या अंत:करणाने निरोप दिला.
आणि वेळ न दवडता- दूरध्वनीवरून मी कार्यालयात एक दिवस आजारी-रजा टाकली.
घरांत भयाण, पण कधी नव्हे ती हवी हवीशी वाटणारी शांतता ! आनंदी आनंद !
अशा 'मंगलवेळी' मी स्वत: माझ्या हातांनी नाष्ट्यासाठी झटपट बटाटेपोहे केले. मस्त झाले.
दुपारी 'चार वर्षे सासूची-' आणि 'मराठी माऊथ रडते पुढे !' या भन्नाट मालिका पाहिल्या.
नंतर छानसा मसालेभात शिजवला, नजर लागाव्यात अशा व्यवस्थित गोलवर्तुळाकार पोळ्या भाजल्या,
मसालेदार वांग्याची रुचकर भाजी आणि चवदार आमटी केली,
अहाहा ! सोबत चक्क खमंग कांदाभजीही तळली.
आनंदाच्या भरात मी स्वरचित 'ती दूर दूर तेथे, स्वैपाक छान येथे' हे सुप्रसिद्ध गाणे गात,
माझ्या स्वत:च्या हातांनी स्वैपाक कधी आटोपला, ते माझे मलाही समजले नाही !
यथेच्छ जेवण झाल्यावर, मी प्रसन्न मुद्रेने माझा टक्कल-चंद्र प्रेमाने कुरवाळत,
स्वस्वैपाकाची स्वगत स्तुती करतच, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ऐकू जाईल- अशी एक लांबलचक ढेकर दिली !
नंतर संध्याकाळपर्यंत मंचकावर लोळत दूरध्वनीवरून मित्र-मैत्रिणीशी मनसोक्त गप्पाही मारल्या !
जीवनात 'आनंद' 'आनंद' म्हणतात, तो यापेक्षा आणखी काही वेगळा असतो काहो ? '
:
अचानक, स्वैपाकघरातून एक भांडे ठणठणाट करीत, माझ्या पायावर येऊन आदळल्याने...
मी खडबडून जागा झालो !
बायकोचे जेवण होण्याची वाट बघतबघत लागलेल्या छानशा डुलकीतल्या "स्वप्ना"ला तडा गेला .
" आज स्वैपाक छान केलात ! उठा, भांडी कधी घासणार आहात ? "
- आपले स्वत:चे हात धूतधूतच बायकोने मला प्रश्न केला.
असतं हो एखाद्याचं नशीब.. , एखाद्या वेळी तरी असेच झोपलेले !
लेखक: विजयकुमार देशपांडे

1 टिप्पणी:
आपले हत धूत धूत .........
तुमच्या पाठीवर का?
टिप्पणी पोस्ट करा