कोणा कशी कळावी...........(१)

(कोणा कशी कळावी,वेडात काय गोडी...चे विडंबन)

कोणा कशी कळावी ''बंदीत'' काय गोडी
मागील दारी सुटती त्यातील गूढ कोडी

सत्ता अचानक मिळता
धाड टाकीत फिरावे
संकेत कळूनी भाई शटर खाली ओढी

होई खूश जनता
परि वर्दी करी फितुरी
पेटीत दडले गूढ पाहुनी हसे ''कडी''

हसले कुणी कळून गूढ सारे
रडले ते ज्यांचे लुटले सारे
''बंद'' दारात करी कुणी कुरघोडी

विडंबनकार:  अरविंद रामचंद्र बुधकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: