टुकारघोडे !


गाच पिळतोस रे मिशा तू, कडमडणे हा विकार आहे
तिच्या खुट्याला तुझ्याप्रमाणे टुकारघोडे हजार आहे

बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फ़ुगून गेला
मुरूम गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे

गमावतो ना कधीच संधी सफ़ेद कुत्रा पिसाळलेला
डसून लचकेच तोडण्याचा ठरून त्याला ’पगार’ आहे

कुठून आणू नवीन गजरा, दुकान शोधू कुठे नव्याने?
सरून पर्याय सर्व गेले, जुनीच देणी उधार आहे

परंपरा-वंश लाभ ज्यांना, इथे तयांनाच ’अभय’ आहे
फ़िरोजघरचे गिधाड-कुत्रे, नेमून येथे हुशार आहे

कवी: गंगाधर मुटे

२ टिप्पण्या:

विजयकुमार देशपांडे म्हणाले...

हझल आवडली .

ऊर्जस्वल म्हणाले...

बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फ़ुगून गेला
मुरूम गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे>>>>>

एवढे वास्तववादी वर्णन तुम्हीच करू जाणे.
कविता आवडली!

नरेंद्र गोळे
२०१२०३०९