गेल्याच महिन्यातली गोष्ट. सकाळी सकाळी बर्याच
कामांची यादी घेऊन बाहेर पडले. त्यात वाण सामान, भाजी, आणि ३ वेगवेगळ्या
बॅंकांची कामे यांचा समावेश होता.
प्रत्येक बॅंकेत लागणार होते ते
वेगवेगळे दस्ताऐवज वेगवेगळ्या प्लस्टिक पिशव्यात व्यवस्थित घेतले होते.
हातात एक छोटी पर्स, ज्यांत पैसे, घराची किल्ली आणि मोबाईल वगैरे होते.
हे सगळे सांभाळत एका बॅंकेतून दुस-या
बॅंकेत गेले. तिथे नेहमीप्रमाणे भरपूर गर्दी. होता होता नंबर लागला एकदाचा.
तिथल्या महिला अधिकार्याच्या समोरच्या खुर्चीत बसून काम उरकले आणि परत कागदपत्र वगैरे नीट
घेऊन निघाले. बाहेर रस्त्यावर आले तर लक्षात आले की पर्स तिथेच राहिली! मग
परत त्याच महिला अधिकार्याच्या टेबलवर पाहिले. पर्स नव्हती!! मग त्यांना सर्व सांगितले व
विचारले, ”माझी पर्स राहिली होती का इथे?” त्या नाही म्हणाल्या. आता अजून
दोन तीन ग्राहक त्यांच्या समोरच्या खुर्च्यांवर बसलेले दिसले!
मला काय करावे सुचेना? खूप घाबरले.
त्यात घराची किल्ली म्हणजे घ्रराबाहेर बसावे लागणार. आणि मोबाईल. तो ही
महत्वाचा!! मी त्या ग्राहकांना विचारू का नको या मनस्थितीत विचारलेच, ”कोणाला दिसली का हो पर्स?" सर्व नाही असे उत्तरले. आता बॅंकेतलीच दुस-या काउंटरवरची महिला मदतीला आली. तिनं विचारले, ”मोबाईल होता ना पर्समधे?” मी
”हो” म्हणाले. मग तिनं विचारलं, ” सायलंट्वर नाहीये ना??? आता नंबर सांगा
पाहू.” मी नंबर सांगितला. तिनं फोन लावला, माझ्या मोबाईलवर .......
माझ्या काखेत मोबाईलची रिंग वाजायला लागली!!!! सगळ्या पिशव्या सांभाळताना, आणि पेपर्स नीट विशिष्ट ठिकाणी ठेवताना मी पर्स काखेत दाबून ठेवली होती. अर्रर्र..हे काय झालं माझ्या हातून. खूप लाज वाटली. सगळे खो खो हसू लागले! मी सर्वांना कसनुसं हसत सॉरी सॉरी म्हणत बसले.
माझ्या काखेत मोबाईलची रिंग वाजायला लागली!!!! सगळ्या पिशव्या सांभाळताना, आणि पेपर्स नीट विशिष्ट ठिकाणी ठेवताना मी पर्स काखेत दाबून ठेवली होती. अर्रर्र..हे काय झालं माझ्या हातून. खूप लाज वाटली. सगळे खो खो हसू लागले! मी सर्वांना कसनुसं हसत सॉरी सॉरी म्हणत बसले.
लेखिका: अनिताताई आठवले
२ टिप्पण्या:
हाहाहाहा
छान !
टिप्पणी पोस्ट करा